प्रादेशिक विद्या प्राधिकरण (आंग्लभाषा तज्ञत्व), छत्रपती संभाजीनगर.
महाराष्ट्र राज्य आंग्लभाषा अध्यापन संस्थेची स्थापना सन १९६५ साली झाली. महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक एसटीसी–२२३६४जी दिनांक २९ मे १९६५ अन्वये संस्था अस्तित्वात आली. माहे नोव्हेंबर १९६५ पासून संस्थेचे कार्य नियमितपणे सुरु झाले.
इंग्रजी विषयाच्या अध्ययन अध्यापनाचा प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील दर्जा सुधारणे हा संस्थेच्या स्थापनेमागील प्रमुख हेतू होता. माहे नोव्हेंबर १९६५ पासून ३१ मार्च १९८६ पर्यंत ही संस्था मुंबई येथे कार्यान्वित होती.
महाराष्ट्र राज्याच्या शैक्षणिकदृष्ट्या मागास व दुर्गम भागात अध्यापकांना या संस्थेच्या विविध उपक्रमांचा लाभ घेणे सहज शक्य व्हावे, या जाणीवेतून ही संस्था मुंबई येथून छत्रपती संभाजीनगर येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. मराठवाडा विकासाचा अनुशेष भरून काढण्याचा एक भाग म्हणून शासन निर्णय क्रमांक एसटीसी/ २८५/ २९३८०/ (६१४/८५)/ माशि–४ दिनांक ११/१२/१९८५ अन्वये मराठवाडा विकासाचा कालबद्ध कार्यक्रम या योजनेमध्ये प्रस्तुत संस्थेचे मुंबई येथून छत्रपती संभाजीनगर येथे स्थलांतर करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर येथे संस्थेचे कार्य १ एप्रिल १९८६ पासून सुरु झाले. त्याच शासन निर्णयान्वये या संस्थेचे नामाभिधान ‘राज्य आंग्लभाषा अध्यापन संस्था, छत्रपती संभाजीनगर’ असे करण्यात आले.
शासन निर्णय क्र. डायट ४५१६/(४०/१६)/प्रशिक्षण, दिनांक १७ ऑक्टोबर २०१६ अन्वये संस्थेची पुनर्रचना होऊन संस्थेचे नाव ‘प्रादेशिक विद्या प्राधिकरण, (आंग्लभाषा तज्ञत्व)’ छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आले आहे.

संस्थेतील कार्याचे स्वरूप:
शासन निर्णय दिनांक १७ ऑक्टोबर २०१६ नुसार प्रस्तुत संस्थेच्या पूर्वीच्या इंग्रजी विषयाच्या राज्यव्यापी कार्यासोबतच मराठवाडा विभागातील आठ जिल्ह्यांसाठी (छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड व धाराशिव) मराठी, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्रे, उर्दू व आय.टी. या विषयांचाही समावेश करण्यात आला आहे. या विषयांसाठी विभागातील सर्व जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था {District Institute of Educational Continuous Professional Development (DIECPD)} [शासन निर्णय क्रमांक डायट–२०१९/प्र.क्र.९२/प्रशिक्षण दिनांक २८ नोव्हेंबर २०१९ नुसार ‘जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था] आणि तालुका व केंद्र स्तरावरील साधन व्यक्ती तसेच शिक्षक सक्षमीकरणाच्या सर्व घटकांची क्षमता समृध्दी करणे अशी नवीन जबाबदारी प्रस्तुत प्रादेशिक विद्या प्राधिकरणाकडे सोपविण्यात आली आहे.
प्रस्तुत शासन निर्णयानुसार विद्या प्राधिकरणाची जबाबदारी पुढीलप्रमाणे असेल:
- राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुणवत्तेच्या परिभाषेचा अभ्यास करून राज्यातील शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी Benchmark निश्चित करणे. या बेंचमार्कमध्ये कालपरत्वे वेळोवेळी आवश्यकतेनुसार बदल करणे.
- निश्चित केलेल्या बेंचमार्कच्या प्राप्तीसाठी
- अभ्यासक्रम विकसन
- पाठ्यक्रम विकसन
- पाठ्य व इतर साहित्य विकसन
- शिक्षक व अधिकारी यांचे सातत्यपूर्ण व्यावसायिक विकसन
- मूल्यमापन प्रक्रिया विकसन
- अडचणींवर मात करण्यासाठी संशोधन करणे
- वरील सर्व बाबींसाठी माहिती संप्रेषण तंत्रज्ञान/संगणक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करणे.
- बेंचमार्क प्राप्तीसाठी सर्व स्तरावर स्पष्टता यावी यासाठी स्पष्ट क्षमता संपादणूक पातळी (Learning Indicators) परिभाषित करून त्यांचे Continuous and Comprehensive Evaluation (CCE) किंवा अन्य मूल्यमापन प्रक्रियेशी सहसंबंध स्पष्ट करणे.
- अभ्यासक्रम, पाठयक्रम, पाठय व इतर साहित्य विकसित करत असताना तसेच शिक्षक व अधिकारी व्यावसायिक विकसन कार्यक्रम आखत असताना समता मूलक विचारांकडे लक्ष देणे. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत १०० टक्के मुलांना शिक्षण द्यावयाचे आहे. परंतु ते राबवत असताना बरेचसे शिक्षक व अधिका–यांना १०० टक्के मुले शिकू शकतात यात विश्वास नसल्याचे जाणवले. त्याच्या मुळाशी क्षमता बद्दलचे समज अपुरे असणे असे ही जाणवले. त्यामुळे माणसाचे चार शरीर प्रकार, विविध धर्म प्रकार, विविध जाती प्रकार, विविध आर्थिक वर्ग, विविध भौगोलिक जन्म स्थान व रहाण्याचे ठिकाण तसेच शहरी व ग्रामीण रहिवास इत्यादी असल्यावर ही माणसे समान असतात हे पटणे सक्षमीकरणाचा सर्वात महत्वाचा घटक आहे. यासाठी विद्या प्राधिकरणाने निरंतर कार्य करणे. या सर्व प्रकारच्या माणसांचे परस्परावलंबनाची संकल्पना समजल्याने क्षमतेची संकल्पना अधिक स्पष्ट होईल हे ध्यानात ठेवणे
- अध्ययन व विकासाच्या विविध संधीसाठी साहित्य तयार करणे. उदा. मुक्त दूरस्थ अध्ययन, स्वयं–अध्ययन, गट आणि केंद्रस्तरावर चर्चा, online स्वयं–अध्ययन आणि चर्चा, प्रमाणपत्र प्रदान किंवा या सर्वांचे विविध combination करणे.
आमची प्रेरणा:

मा. श्री. दादाजी भुसे
मंत्री, शालेय शिक्षण,
महाराष्ट्र राज्य

मा. श्री. पंकज भोयर
राज्यमंत्री, शालेय शिक्षण
महाराष्ट्र राज्य

मा. श्री. रणजितसिंग देओल (भा.प्र.से.)
प्रधान सचिव
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

मा. श्री. राहूल रेखावार (भा.प्र.से.)
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र



